दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -सागर पाटील गव्हाड
मेहकर
मोदी सरकारला नुकतेच यशस्वी ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित “संपर्क से समर्थन” अंतर्गत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली मेहकर शहरात संपर्क से समर्थन मेळाव्यास उपस्थित अभियानाची माहिती दिली.
तसेच शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या घरी भेटी देऊन समर्थन प्राप्त केले. यामध्ये कृषी मालाचे व्यापारी शंकरसेठ अग्रवाल. प्राचार्य हेमंत कणीमंडण . आनंद काटकर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर यांच्या घरी भेट दिली. यावेळेस वडार समाजातील लोकांनी , नातेवाईकांनी भुपेंद्र यादवांचा यथोचित सत्कार करण्यात आला. एवढ्या मोठ्या भाजपाचे केंद्रीय मंत्र्यांने वडार वाड्यात जाऊन सत्कार स्वीकारल्याने वडार समाजातील लोकांनी अभिमानाने भाजपा प्रति प्रेम व्यक्त केले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर यांचे मनगहिवरुण आले. यावेळेस लोकसभेचे भाजपाचे महाराष्ट्र संयोजक माजी मंत्री संजय कुटे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, खामगाव चे आमदार आकाश फुंडकर, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.