दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मेहकर -सागर पाटील गव्हाड
सर्व सामान्य लाभार्थी यांनी कोणाकडे करावी मागणी
मेहकर आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई,म्हशी,शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते.
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय,म्हशी,शेळी,कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्यासाठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत
पंचायत समिती मेहकर.
श्रीकृष्ण बबनराव मवाळ ग्रामपंचायत कासारखेड अंतर्गत अर्ज केला असता पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी जा.क्र./पंसमे/मगांराग्रखरोहयो -म/९९०/२०२३दि.३१/०५/२०२३
प्रती,सचिव ग्रामपंचायत कार्यालय, कासारखेड यांना
पत्र देऊन मौजे कासारखेड येथील वैयाक्तिक गुरांचा गोठा प्रस्ताव परत करणे बाबत.दिले
आपले पत्र क्रमांक 2082 दिनांक 23/05/2023 नुसार प्राप्त दिनांक 25/05/2023 महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक : पाविआ – १०२२/ प्र.क्र.३४९/पदुम-३ दिनांक २४ एप्रिल २०२३
उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, मौजे कासारखेड येथील वैयक्तिक गुरांचा गोठा फाईल १ ) श्रीकृष्ण बबनराव मवाळ ह्यांच्या गुरांच्या गोठ्याचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाला असून संदर्भ-२ नुसार मान्यता देण्याचे अधिकार हे पशुधन विकास अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहे, तरी सदर प्रस्ताव आपण पशुधन विकास अधिकारी यांना सादर करावा करिता आपणास सूचित करण्यात येत आहे.प्रतिलिपीत मा. उपजिल्हाअधिकारी (रोहयो) जिल्हाअधिकारी कार्यालय,बुलढाणा मा. उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) जि.प .कार्यालय,बुलढाणा यांना महितीस्तव सविनय सादर.
केले
*पशुसंवर्धन विभाग पशुधन विकास अधिकारी (विस्तार) , मेहकर म्हणतातसध्या आमच्या कडे सध्या अधिकारनाही*
जा.क्र.पंसमे/पशुसवी/540/2023 पंचायत समिती मेहकर (पशुसंवर्धन विभाग)
दिनांक 31/01/2023
ग्राम पंचायत कार्यालय कासारखेड ता. मेहकर
मौजे कासारखेड येतीत वयक्तिक गुरांचा गोठा प्रस्ताव कार्यालय सादर झाला असून महाराष्ट्र शासन निर्णय के पा.वि.आ./२०२२.प्र. ३४९/५..म ३ दि.२४-०४-२०२३ वरील विषयास अनुसरून मौजे कासारखेड येथील श्री श्रीकृष्ण बबनराव मवाळ यांचा गुरांचा गोट्याचा प्रस्ताव आपण सादर केला आहे. परंतु प्रशासकीय व तांत्रिक मान्यता सद्यपरिस्थिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयाला नसल्याने पुढील कार्यवाही करता येणार नाही. संदर्भ २ नुसार शासनाच्या परिपत्रका नुसार गोट्याच्या प्रशासकिय व तांत्रिक मान्यता पशुधन विकास अधिकारी यांना देण्यात आलेली आहे. परंतु परिपत्रकाचे संपूर्ण अवलोकन केले असता मनरेगा विभागामार्फत पशुधन विकास अधिकारी यांना प्रशिक्षण व Login id तसेच मनरेगा यंत्रणेचे प्रशिक्षण देण्यात येईल व त्यानंतर सदर अधिकार पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयाला देण्यात येणार आहे. सदर प्रस्ताव हा मागील प्रमाणेच सादर करून सदर लाभार्त्याची दिशा भुल होणार नाही याची काळजी घ्यावी अशी दिलेल्या पत्रात ग्रामपंचायतला नमुंद केले
मा. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा.गटविकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांना माहितीत्व सविनय सादर करून वैयक्तिक गुरांचा गोठ्या साठी हेळसांड होत असुन लाभार्थी यांनी कोणाकडे अर्ज सादर करावा असा प्रश्न मेहकर तालुक्यातील लाभार्थी पडला आहे.