दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भू म:-तालुक्यातील सावरगांव – दरेवाडी येथील ग्रामपंचायतमध्ये अपहार, बनावट पावत्या यासह कामकाजात गंभीर अनियमितता आढळून आल्याने तत्कालीन ग्रामसेवक यांच्यासह सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील सावरगांव(द) येथील राजेंद्र बोराडे, सुंदर अधारे व ज्ञानेश्वर मस्के यांनी ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.या प्रकरणाची गटविकास अधिकारी बी.आर.ढवळशंख यांनी तात्काळ दखल घेत चौकशी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पी.एस. इंगळे यांची नियुक्ती केली होती. विस्तार अधिकारी पी.एस.इंगळे यांनी तात्काळ चौकशी करून अहवाल गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख यांच्याकडे दाखल केला. यानंतर पंचायत समिती कडून चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेल्या नंतर कारवाईचे आदेश देण्यात आला. गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने चौकशी अवहालातील गंभीर मुद्द्यावरून घोट्याळ्याशी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली आहे.तत्कालीन ग्रामसेवक पुराणिक यांच्यासह विद्यमान सरपंच रावसाहेब भोसले यांना अपहार केलेली रक्कम८७०७२ रुपये भरण्याचे आदेश नोटीसद्वारे बजविण्यात आले असून सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सात दिवसात खुलासा सादर न केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नोटीस व्दारे कळविले आहे.
*या गंभीर मुद्यावरुन कारवाई:-*
पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतसाठी जे साहित्य खरेदी केले आहे त्या साहित्याच्या पावत्यावर तारखा नाहीत. तसेच कॅश बुकही उपलब्ध नाहीत.पंधराव्या वित्त आयोगाच्या खर्चाला प्रशासकीय मान्यतेवर ग्रामसेवकाच्या स्वाक्षऱ्या तसेच तारखा नाहीत. तसेच साहित्याच्या दरपत्रकावर दुकानाच्या नावा व्यतिरिक्त कोणताही तपशील नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगाच्या खर्च बिलाच्या पावत्या बनावट,जीएसटी व इतर शासकिय देण्याबाबत जमा करण्यात आलेला खर्च बेकायदेशीर आणि पावत्याविना असल्यामुळे ८७ हजार ८२ रुपयांचा प्रथमदर्शनी अपहार तसेच ग्रामसभेच्या आयोजना बाबत पुरेसा प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली नसल्याचे नमूद केले आहे. या गंभीर मुद्दाचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.