दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार धडे काढून टाकल्याने त्याविरोधात काल भाजपतर्फे शहर कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, प्रमोद कोंढरे आदी उपस्थित होते.कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी यावेळी भाजपतर्फे घोषणाबाजी करण्यात आली. मुळीक म्हणाले, सावरकर आणि हेडगेवार हे आमचे दैवत आहेत, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही केवळ राहुल गांधींना खूष करण्यासाठी कर्नाटक सरकारने या महापुरुषांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आता उद्धव ठाकरे, संजय राऊत हे काय भूमिका घेणार हे स्पष्ट करावे.