दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:आज दिनांक 17 जून 2023 रोजी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालय राम भरोसे चालत असल्यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे अचानकपणे भेट देऊन उपस्थित रुग्णांकडून सुविधा व गैरसुविधा विषयी जाणून घेतल्या व प्रत्येक रुग्णांना तब्येतीविषयी विचारपूस करून अजून कशा चांगल्या सुविधा देता येथील याविषयी रुग्णांना मार्गदर्शन केले तसेच सतत काही डॉक्टर गैरहजर व वेळेवर न येणारे अशा डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याविषयी जाणीव करून देऊन रुग्णांच्या सुविधेमध्ये कुचराई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे सजड दम दिला अनुपस्थित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे वरिष्ठांना आदेश दिले सिटीस्कॅन टरमा केअर सेंटर ब्लड स्टोरेज सोनोग्राफी मशीन एक्स-रे मशीन साफसफाई व इतर बाबीची सखोल चौकशी करून तात्काळ याच्यामध्ये दुरुस्ती झाल्या पाहिजे असे आदेश देण्यात आले ओपीडी मध्ये सर्व विभागाचे डॉक्टर वेळेवर उपस्थित राहिले पाहिजे अनुपस्थित डॉक्टरांना कारवाई करण्यात यावी असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यावेळी दवाखान्यातील डॉक्टर व आरोग्यकर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित.