दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार सुकेशनी संदिप सावंत शिवसेना मागासवर्गीय महिला नांदेड जिल्हा प्रमुख व संघटक प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या मागासवर्गीय महिला विभागाच्या नांदेड उपप्रमुख म्हणून सौ. संगीता आनंंदा शेटवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीनुसार पदाधिकारी व शिवसैनिकांना विचारात घेऊन शिवसेना मागासवर्गीय महिला विभागाची जबाबदारी पार पाडावी असे सावंत यांनी सांगितले तसेच पुढील भावी कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत.