दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतुन व शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग श्रीमती सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत किनवट तालुक्यातील मौजे शिवणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या आवारात रोपे लागवडीला सुरुवात केलीआहे.उद्घाटक म्हणुन गटशिक्षणाधिकारी बने, वनपरिक्षेत्रअधिकारी उमेश ढगे यांच्या हस्ते रिबीन कापून सुरुवात करण्यात आली.वनविभागा कडून शाळेच्या प्रांगणात रोपे लागवड करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वनविभागच्या वनपरिक्षेत्र कार्यालय अप्पारावपेठ अंतर्गत येणाऱ्या वनपरिमंडळ शिवणीच्या वतीने पहिल्यांदा शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शालेय प्रांगणात वृक्षरोपण करण्यातआले.या वेळी मुख्याध्यापक बी.एल.चव्हाण यांच्या निदेर्शानुसार शाळा परिसरात रांगोळी, रंगरंगोटी,सुशोभीकरण करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आले होते.या वेळी प्रमुख उपस्थिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भोजराज देशमुख,दत्ता बेहरे,शेख जब्बार,पत्रकार प्रकाश कार्लेवाड,विलास भालेराव,दशरथ आंबेकर,शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड,केंद्र प्रमुख पांचाळ, वनपाल बी.टी.जाधव,श्रीराम सज्जन, वनरक्षक अंकुश पाडाळे, दिगांबर खरोडे,धोतरे रघुनाथ,वनवे,शैलेश वाघमारे,ज्ञानेश्वर माहुरेसह पालकवर्ग उपस्थित होते.तर पहिला दिवस पहिले पाऊल हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जी.जी.तरटे, एस.एस.गवळी,के.बी.फोले,टी.जे. सय्यद,एस.जे.जाधव,जे.बी.मलगे, आर.एस.चव्हाण,बी.डी.राठोड, बी.पी. कांबळे,वनमजुर नसिंगराव,खंडू, खोकले,श्रीकांत आदी उपस्थित होते.याच दिवशी वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांच्या उपस्थितीत वनपाल बी.टी.जाधव यांचा वाढदिवस साधेपणाने केक कापून साजरा करण्यातआलाआहे.