दै चालु वार्ता वृत्तसेवा /
मुंबई :बुधवारी राऊत यांनी गोवा विधानसभेच्या ४० जागांपैकी २२ जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची सांगितले .
तसेच गोव्यामध्ये शिवसेनेचं सरकार आलं तर शिवसेना महाराष्ट्रामधील प्रशासनाप्रमाणे गोव्यामध्येही चांगली कामगिरी करणारं सरकार देईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.दरम्यान, गोव्यामध्ये मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे निवडणुकीचा प्रचार करतील, असे राऊत यांनी सांगितले, यावर गुरुवारी बोलतांना चंद्रकात पाटील यांनी हात जोडले.
शिवसेना गोव्याच २२ जागांवर लढेल. आम्ही पक्ष तोडण्याचे काम करत नाही. जसे गोव्यात झाले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. यावर बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मला काहीच म्हणायचे नाही. आता मी ठरवलं आहे जे माझ्या स्तराचे असतील त्यांच्यावरचं मी बोलेल‘, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता संजय राऊत यांना लगावला आहे.