हिंदू-मुस्लिम एकवटून उमापूरच्या चौकीला दिले निवेदण…
दै.चालू वार्ता
उमापूर/प्रतिनिधी कृष्णा जाधव
गेवराई ,उमापूर ,गत काही दिवसापासून राज्यभरात सोशल मिडीयाच्या पोस्ट मुळे हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, फेसबूकवर घनसांगवी येथील एकाने प्रेषीत मुहम्मद सल्ल. विषयी प्रक्षोभक पोस्ट केल्याने उमापूर येथील संपुर्ण हिंदू-मुस्लिम समाज एकवटून पोलीस चौकीत जमा झाला जमावाने सदर पोस्ट करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावुन धरल्यानंतर अखेर दुपारी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उमापूर येथील अरबाज अय्युब पठाण याच्या मोबाईल वरील फेसबुक वर समाज विघातक पोस्ट केल्याचे निदर्शनास आले त्यावरुन त्यांनी समाजातील मुबारक शेख, अजहर ईनामदार, जुबेर कुरेशी, जलील पठाण, शकिल शेख यांना सदरील गणराज नाईक पाटील याने केलेली अक्षेपाहर्य पोस्ट दाखवली त्यानुसार दि. ७ शनिवार रोजी मौलानांसह मुस्लीम आणि रवी कापसे, राजु पोकळे, ज्ञानेश्वर हवाले, कृष्णा जाधव सह ईतर हिंदु धर्मीय नागरीकांनी उमापूर पोलिस चौकी येथे स्वाक्षऱ्या करुन गणराज नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावे या बाबद निवेदन दिले, सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला असता सर्व हिंदू-मुस्लीम नागरीकांनी उमापूर पोलिस चौकी समोरच लोकशाही मार्गाने ठीय्या मांडल्याने अखेर चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि. नारायण एकशिंगे यांच्या सूचनेवरून आरबाज पठाण यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलिस ठाण्यात गणराज नाईक पाटील याच्या विरोधात भादवी २९५ A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोउनि रामेश्वर इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.