दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :नवरात्रोत्सवाच्या अंती दसरा (विजयादशमी) सण दि.२४ मंगळवार रोजी येवून ठेपलेला आहे.दसऱ्याच्या ह्या पर्वावर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.अश्यातच दसरा दिनी सार्वजनिक सुट्टी असून नियम धाब्यावर बसवून नियम उल्लंघन करून चोरून-लपून दारू विकणाऱ्यांवर पोलीस कारवाही करणार का? असा सवाल नागरिकांना पडला आहे.
२०२३ सालच्या ‘ड्राय डे’ च्या यादीमध्ये एकूण २२ दिवस दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार असे शासनाने जाहीर केले होते.’ड्राय डे’च्या या तारखांसोबतच वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सण आणि जयंतीनुसार ‘ड्राय डे’ जाहीर केला जातो.ज्या शहरात ‘ड्राय डे’ असतो तिथं मद्यविक्रीची दुकानं बंद ठेवण्यात येतात.याशिवाय ज्या ठिकाणी निवडणूक मतदान असते त्याठिकाणीही मतदानाच्या ४८ तास आधीपासूनच मद्य विक्रीवर बंदी असते.
मंगळवार रोजी दसरा सण आहे.हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.दसऱ्याला (विजयादशमी) आपट्याच्या झाडांची पाने सोने म्हणून एकमेकांना दिले जातात.सण आनंदात पार पडावा अशी सर्वांची इच्छा असते.परंतु या सणाला गालबोट न लागावे करिता दारू कारणीभूत ठरणार तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अंजनगाव सुर्जी शहरांच्या मुख्य ठिकाणांसोबतच दर्यापूर रोड,परतवाडा रोड व अकोट रोडवर पोलीस प्रशासन नेहमीच तैनात असतात.परंतु नवरात्रोत्सवाच्या अंती दसऱ्याला नियमांना डावलून दारू विक्री करणाऱ्यांच्या तसेच मद्यप्रेमींच्या भूमिकेत दसरा सणाला रावण तर जागा होणार नाही ना? असा विचार प्रत्येकांच्या मनात येत आहे.सोबतच ड्राय डे ला दारू विक्रीवर आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासन ठोस उपाय योजना राबविणार असा विचार सुद्धा घेऊन शहरातील नागरिक पोलीस प्रशासनाकडे बघ्यांच्या भूमिकेत आहेत.
चौकट
१४ जानेवारी २०२३ मकर संक्रांती (काही राज्यांमध्ये),२६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिन देशभरात,३० जानेवारी २०२३ महात्मा गांधी पुण्यतिथी देशभरात,८ मार्च २०२३ होळी (काही राज्यांमध्ये),३० मार्च २०२३ राम नवमी (काही राज्यांमध्ये),४ एप्रिल २०२३ महावीर जयंती (काही राज्यांमध्ये),७ एप्रिल २०२३ गुड फ्रायडे ,१४ एप्रिल २०२३ आंबेडकर जयंती ,२२ एप्रिल २०२३ ईद-उल-फित्र,२९ जून २०२३ आषाढी एकादशी (काही राज्यांमध्ये),३ जुलै २०२३ गुरु पौर्णिमा (काही राज्यांमध्ये),२९ जुलै २०२३ मोहरम,१५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिन देशभरात,६ सप्टेंबर २०२३ जन्माष्टमी (काही राज्यांमध्ये)
१९ सप्टेंबर २०२३ गणेश चतुर्थी (काही राज्यांमध्ये)
२८ सप्टेंबर २०२३ अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद (काही राज्यांमध्ये)
२ ऑक्टोबर २०२३ गांधी जयंती पूरे देश में
२४ ऑक्टोबर २०२३ दसरा (काही राज्यांमध्ये)
२८ ऑक्टोबर २०२३ महर्षी वाल्मिकी जयंती
१२ नोव्हेंबर २०२३ दिवाळी देशभरात
२७ नोव्हेंबर २०२३ गुरुपूरब (काही राज्यांमध्ये)
२५ डिसेंबर २०२३-ख्रिसमस