आज पर्यंत लढलो माती साठी आता लढा मराठा जाती साठी
दै.चालु वार्ता नांदेड
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील कळका गावात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योध्दा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालु असलेल्या मराठा आरक्षण आमरण उपोषणाला पाठिंबा देत चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण आमचे एकच लक्ष मराठा आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गाव बंदी राहील आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. कोणत्याही पक्षाचे बॅनर गावात लावणार नाही. आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार राहिल तसेच आजवर लढलो मातीसाठी आता लढा जातीसाठी असे कळका येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने प्रवेश निषेध चे बोर्ड लावून पक्षाना व नेत्यांना गावबंदी करून मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. यावेळी शिवराज गायकवाड, साहेब गायकवाड, राम गायकवाड, नितीन गायकवाड,संतोष गायकवाड,रत्नाकर गायकवाड, बालाजी गायकवाड, भरत गायकवाड, नवनाथ पुरी, किंचक गायकवाड, मारोती गायकवाड, अजय गायकवाड, आकाश गायकवाड, श्यामसुंदर गायकवाड, गिरीश गायकवाड, बळीराम गायकवाड, तिरूपती गायकवाड, दिलीप गायकवाड, लिंबाजी गायकवाड, सतिश प्रल्हाद गायकवाड हे सर्व उपस्थित होते.