दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर:- उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे पोखरभोसी ता.लोहा येथे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे – पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथेही आमरण उपोषणास दि. ३० ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आला आहे .
यावेळी ह. भ. प. प्रकाश महाराज डांगे, उद्धव शिवराम डांगे , श्रीनिवास नारायण ताटे हे आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत. या आमरण उपोषणास पाठिंबा देत गावात राजकिय नेत्यांना गाव प्रवेश बंदी यापूर्वीच करण्यात आली आहे. मतदानावर देखिल बहिष्कार टाकण्यात आला आहे.
तसेच गेल्या ४४ दिवसांपासून पोखरभोसी येथे साखळी उपोषण देखिल करण्यात आले आहे.
सदर साखळी उपोषणास आजपर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी देऊन आपले आरक्षणासाठी समर्थन दर्शवले आहे .
महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सुरु असलेल्या उपोषणाची शासनाने दखल घेऊन मराठा समाजाचा ओ बी सी प्रवर्गात समावेश करून सुरु असलेले आमरण उपोषण तात्काळ सोडवावे ही मागणी होत आहे.