दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
श्री शिवाजी कॉलेज माणिक नगर नवीन कौठा नांदेड चा 12 वी वर्गात शिकणारा विद्यार्थी श्रीकांत स्वामी या विद्यार्थ्याने 19 वर्षे वयोगटांमध्ये 56 ते 60 किलो वजन गटात विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत विजय पटकावला व त्याची राज्य पातळीवरील खेळासाठी निवड झाली आहे.
या खेळासाठी श्रीकांत ला क्रीडा शिक्षक प्रा .सोनकांबळे सर सुशील कुरुडे सर व प्राध्यापिका संगीता स्वामी मॅडम यांनी मार्गदर्शन केले होते
त्याच्या या यशाबद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, संस्था सचिव गुरुनाथरावजी कुरुडे साहेब, संस्थेचे सहसचिव मुक्तेश्वरराजे धोंडगे , शालेय समितीचे सदस्य वैजनाथरावजी कुरुडे सर ,शालेय समिती सदस्य सूर्यकांत कावळे सर ,शालेय समितीचे सदस्य मधुकरराव कुरुडे सर, शाळेचे ओ. एस .इंद्रजीत बुरपले सर, यांनी व शाळेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदरील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या…