दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:- दिवसेन दिवस मनोज जरागे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होतं असताना सरकार आरक्षणावर कुठलाच मार्ग काढत नसल्याने मराठा समाज आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे कंधार तालुक्यातील येलूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१(अ) वर सकाळी सात वाजल्यापासून रास्तारोको आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील मुखेड नांदेड कंधार आगाराच्या बस सेवा खाजगी वाहाने संपूर्ण पणे ठप्प झाली होती.सकल मराठा समाज येलूर तसेच परिसरातील मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित होते.