गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड – शिवजयंतीनिमित्त राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव उर्फ माधवराव धर्माधिकारी यांनी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
16 फेब्रुवारी 2024 रोजी कंधारच्या प्राचीन भुईकोट स्वच्छता व सफाई करुन स्वराज्य सप्ताह निमित्त मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष मा. दिलीपराव उर्फ माधवराव धर्माधिकारी साहेब जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव धर्माधिकारी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष ॲड.बाळासाहेब सोनकांबळे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव मुकनर,विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवचंद्र डांगे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मा. फांजेवाड साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,कंधारचे कार्याध्यक्ष सुभाषराव राहेरकर,उपाध्यक्ष गोपीनाथ केंद्र,सरचिटणीस डाॅ.प्रदिपसिंह राजपुत,किशनराव बोंबले ओबीसीचे ता.अध्यक्ष शंकरराव बामनवाड,संभाजी पाटील, छत्रपती स्वामी,शिवराज पाटील,राम पवार, मारोती कांबळे,गजानन पालीमकर ई.मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंधार तालुका अध्यक्ष मा.मनोहर पाटील भोसीकर व युवक अध्यक्ष गणेश ठेवरे यांनी केले होते.