दैनिक चालू वार्ता,
नंदुरबार प्रतिनिधी,
संदीप मोरे
खासदार डॉ.हिनाताई गावित यांनी “ड” यादीत समविष्ट करण्याचे ७८ कुटुंबियांना दिले आश्वासन
शहादा:
शहादा तालुक्यातील पिंगाणे ग्रामपंचायतीने ७८ कुटुंबियांची घरकुलाच्या यादीतून पात्र लाभार्थ्री चौकशी न करता अपात्र ठरवले.दिनांक ७/१०/२०२१ पासून शहादा येथे बाबासाहेब आबेडकर पुतळा जुने तहसील कार्यालय जवळ “आमरण उपोषण”.पिंगाणे या गावातील प्रधानमंत्री आवास योजना “ड” यादीत परस्पर रित्या ग्रामपंचायतीने सर्वे न करता वगळले,असून येथिल भोई समाजातील महिला आमरण उपोषणास बसले होते.
यावेळी उपोषणाला यमुनाबाई भोई,सुशीलाबाई भोई,जयाबाई भोई,जगदीश भोई,शांताबाई भोई,धनुबाई भोई,मंगलाबाई भोई,हिराबाई भोई,ऋषिकेश भोई,पांडुरंग भोई,एकनाथ भोई, यासह ३० ते ३५ महिला उपोषणास बसले होते. तर माझी नगर सेवक सुपडू भोई व जयवंत भोई यांनी देखील भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
घरकुल नोंद करणाऱ्या लाभार्थ्यांकडून एक हजार रुपये मागणी केल्याचा गंभीर आरोप केला असून खोटी माहिती भरून लाभार्थ्यांचे कोऱ्याच कागदावर अंगठा घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.घरकुल योजने पासून लाभार्थ्यांना वंचित ठेवण्याचे षड्यंत्र शहादा पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचार्यांकडून होत असल्याचा आरोप उपोषणाला बसलेल्या यमुनाबाई भोई यांच्यासह महिलांनी केला आहे.उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी भेट दिली असता त्यांना उपोषकर्त्यांनी घेराव घातला.असून चर्चेतू निष्पन्न न निघाल्याने उपोषण हे दुसऱ्या दिवशी देखील सुरूच ठेवले. उपोषणकर्ते व वंचित लाभार्थी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन हे लक्ष देत नाही असा आरोप केला असून, तिसऱ्या दिवशी दिनांक ९/१०/२०२१ रोजी खासदार डॉ. हीना ताई गावित आणि आमदार डॉ.विजयकुमार गावित साहेब यांनी उपोषण कर्त्यांना भेट दिली असता डॉ.हिनाताई गावित यांनी पिंगाणे ग्रामस्थांतील महिलांना ७८ कुटुंबातील गुपित रित्या सर्वे झाला असून आता पुनर्सुधारित सर्वे करून नागरिकांना न्याय मिळवून देईल आणि यासाठी सतत पाठपुरावे करीत राहीन असे आश्वासन खासदार डॉ. हीना ताई गावित उपोषणकर्त्यांना दिले. यावेळी आमदार डॉ. विजय कुमार गावित व खासदार डॉ.हीना ताई गावित यांनी लाभार्थ्यांना आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडले.