दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी :लोहारा तालुक्यातील माकणी : (दि 8-10-2021) पासून मुसळधार अतीवृष्टी होत आहे आणिक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पिके काढणीला सुरुवात असुन त्या पिकाची अतिवृष्टी मुळे नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट वडवले आहे.त्यामुळे संकटात सापडलेले शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.
शेतीसह पिकांचे नुकसान शेतकरी भिषण संकटात
शेतकऱ्यांना आशा होती या वर्षी चांगलं पिक येईल पण पाऊसाने होत्याच नव्हतं करून ठेवलं शेतकऱ्यांनी कसं जगाव प्रश्न पडतोय शेतकऱ्यां पुढे शेतात राब -राब राबायच शेतकरी हा कर्ज काढून शेती पिकवतो तरी रान हिरव गार करायचं कष्ट करून चार पैसे मिळतील त्या अपेक्षने शेती करतो. नागरी पाळी पेरणी फवारणी काढणी पर्यत शेतकरी सोयाबीन ला जपतो त्या पिकला लहान लेकरासारख जपतो
पण कर्ज घेऊन रान फुलवल जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस काबाडकष्ट करून विजांचा गडगडाट अशा कितीतरी संकटांना तोंड देत शेतकरी पुढी जाण्याचा प्रयत्न करतो पण पेरणी केल्यानंतर पाऊस गायब होतो पिकं काढते वेळेस पाऊस हा शेतकऱ्यांना त्रास देऊन जातो.
शेतकरी हा चितेतूर झालेला आहे त्याला तिच्या मुलांच्या लग्नाची चिंता मुलाच शिक्षण घरची परिस्थिती सावरकराच कर्ज बँक कर्ज कसं फेडयच या प्रश्न शेतकऱ्यांना पडला पण या वर्षी पण पाऊसाने घात गेला शेतकरयांची आस वाया गेली चार पैसे जास्त मिळतील या अपेक्षेने सोयाबीन, उडीद मूग अशा पिकाची लागवड करतो पण ति पिकं नगदी पीक म्हणून ओळखला जाते तरी ती पाऊसाने हिरावून घेतल.
तरीपण कधीही न रडणारा जगाचा पोशिंदा शेतकरी अविरतपणे लढत राहिला.पाऊस कधी कमी झाला कधी राखरांगोळी झाली. गेल्या विस दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी च पाणी कोण्याच्या ताडपत्र्या नदी काठच्या लोकांच्या पिके पाण्याखाली गेली
आर्थिक बळ देणारे पीक म्हणून ओळखल जाणारया पीकाची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे वादळी वाऱ्यासह पावसाने शेती शिवारात उरल्यासुरल्या ती सुद्धा हातात येईल अशी आस होती ती पण ती पण वाया गेली. सोयाबीनच्या गंजीवर झाकताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे
सरकारने आशेवर झुलवत ठेवायचं आणि निसर्गान जगणच अवघड करून ठेवलं
आता तरी सरकारकडून अपेक्षा आसताना सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतय सरकार आता तरी शेतकऱ्यांना मदत करेल का?
राज्यसरकारने आधार देत सरसकट पणे मदत द्यावी अशी मागणी शेतकऱी वर्गातून होत आहे