
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- कंधार चे भूमिपुत्र नागार्जुन पब्लिक स्कूल नांदेड येथील कला शिक्षक निळकंठ रामराव कंधारे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित लोकशाहीची भिंत 2022 च्या स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त केल्याची व स्पर्धेत रेखाटलेल्या चित्रांची सर्व स्थरावर स्थिुती होत आहे निळकंठ रामराम कंधारे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आसुन उत्कृष्ट चित्रकार, मुर्तीकार व मृदंग वादक आहेत.
सर्व गुण संपन्न आशा कंधारे सरांना जिल्हा निवडून अधीकारी नांदेड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी , जिल्हा निवडणूक अधिकारी नागार्जुन पब्लिक स्कूल चे संस्थापक श्री केशव गडम , मुख्याध्यापिका सौ. शौला पवार, आदी शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते.