
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मित्रांनो, आपण नेहमी जगातील सर्वात श्रीमंत देश जसे की अमेरिका, जपान, जर्मनी या देशांबद्दलच बोलत असतो. पण मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की आपल्या जगामध्ये असेही अनेक देश आहेत की तेथील लोकांना दोन वेळचे जेवण मिळणं सुद्धा कठीण जातं. अनेक गरीब देशांचा जीडीपी आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत लोकांकडे असलेल्या पैशापेक्षा कमी आहे. तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जगातील 10 सर्वात गरीब देशांची
माली :-
मित्रांनो माली हा आफ्रिकी देश आहे आणि आफ्रिका महाद्वीपच्या पश्चिमेला स्थित आहे. दोन करोड लोकसंख्या असलेला हा देश आफ्रिकेतील सर्वात मोठा चौथा देश आहे. आणि तसं तर या देशाने 1950 मध्ये फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले होते. परंतु अजूनही या देशांमध्ये काही खास सुधारणा झाल्या नाहीत. या देशातील लोक शेती आणि मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. या बिजनेस मध्ये सुद्धा येतील प्रत्येक व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1.40 लाख रुपये आहे आणि येथील 41 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या खाली येते. याशिवाय येथील लोकांची सरासरी आयुर्मर्यादा 58 वर्षे इतकीच आहे.
चार्ड:-
मित्रांनो चार्ड हा सुद्धा एक आफ्रिकी देश आहे. येथील लोकसंख्या जवळजवळ 1 करोड 70 लाख आहे. आणि या देशातील गरिबीचे मुख्य कारण येथील खराब इन्फ्रास्ट्रक्चर आणि उग्रवादी ग्रुप पोको हरामीला मानले जाते. या देशाला जगातील सर्वात भ्रष्ट देशांमध्ये सुद्धा गणले जाते. या देशातील लोकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1.27 लाख रुपये आहे. आणि येथील 48 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या खाली जीवन जगत आहे. याशिवाय येथील लोकांची सरासरी आयुर्मर्यादा 53 वर्ष आहे.
बुर्किना फासा :-
मित्रांनो तुमच्यातील अनेकजण तर या देशाचं नाव नवीनच ऐकत असतील. त्यासाठी मी सांगू इच्छितो की हा सुद्धा एक आफ्रिकी महाद्वीपच्या पश्चिमेला स्थित देश आहे. दोन करोड पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा देश एक लँडलॉक्ड देश आहे, म्हणजेच या देशाचा कोणताच किनारा सागराला मिळत नाही. माली देशाप्रमाणेच हा देश सुद्धा फ्रान्स चा एक भाग होता.
1960 मध्ये त्यांनी फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले होते, परंतु खूप दिवस गुलामीत राहणे आणि भयंकर दुष्काळामुळे या देशाची अवस्था अशी झाली की याला जगातील सर्वात गरीब देशांमध्ये सामिल केलं गेलं. सध्या या देशातील व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1.20 लाख आहे आणि येथील लोक जवळ-जवळ 60 वर्षे जीवन जगतात. याबरोबरच येथील 40 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या खालील जीवन जगते.
स्टेरा लियोन :-
मित्रांनो आपल्या इतर देशांच्या यादी प्रमाणेच हा सुद्धा एक आफ्रिकी देश आहे. 81 लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा देशाला 11 वर्षे चाललेल्या युद्धाने आणि तीन वर्ष आतंक गाजवणाऱ्या इबोला महामारीने बरबाद केले. आणि आज अवस्था अशी झाली की 53 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या खाली येते. या शिवाय येथील लोकांचे सरासरी आयुर्मान 52 वर्षाचे आहे. येथील लोकांचे वार्षिक उत्पन्न प्रति व्यक्ती 90 हजार रुपये आहे.
साऊथ सुदान :-
मित्रांनो साऊथ सुदान हा सुद्धा एक आफ्रिकी देश आहे. L जो कि आफ्रिकी महाद्वीपच्या मध्य पूर्वेला स्थित आहे. या देशाने 2011 मध्ये सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळवले आहे आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे. आणि यामुळेच या देशाला जगातील गरीब देशांमध्ये सामील केले जाते. सन 2016 मध्ये जाहीर केलेल्या वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार साउथ सुदानमधील 82 टक्के पेक्षा जास्त लोक गंभीर गरिबीचे शिकार आहेत. येथील लोकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न फक्त 70 हजार रुपये आहे आणि येथील लोकांचे सरासरी आयुर्मान 57 वर्ष इतकेच आहे.
बुरुंडी :-
मित्रांनो बुरुंडी हा सुध्दा एक आफ्रिकी महाद्वीपमध्ये वसलेला एक लहान देश आहे. ज्याची एकूण लोकसंख्या 1 करोड 22 लाखच्या आसपास आहे. 1962 मध्ये या देशाने बेल्जियम पासून स्वातंत्र्य मिळवले होते. बुरुंडी तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या समस्येने पीडित आहे. 1994 मधील गृहयुद्ध यामुळेच येथील 64 टक्के पेक्षा जास्त लोक गरिबीने पीडित आहेत. आणि येथील लोकांचे वार्षिक उत्पन्न आहे 51 हजार रुपये आहे. येथील लोकांचे सरासरी आयुर्मान हे 57 वर्षाचे आहे.
लायबेरिया :-
मित्रांनो लायबेरिया हा पश्चिम आफ्रिकी तटावर स्थित एक छोटासा आफ्रिकी देश आहे. या देशाच्या गरिबीला कारण 1989 पासून 2003 पर्यंत चाललेले गृहयुद्ध आहे. ईबोला महामारिने सुद्धा येथे मोठा घात केला आहे. येथील लोकांचे वार्षिक उत्पन्न आहे फक्त 48 हजार रुपये आहे. येथील 51 टक्के पेक्षाही जास्त लोक गरिबीने त्रस्त आहेत. 51 लाख लोकसंख्येच्या या देशात सरासरी आयुर्मान फक्त 63 वर्षे आहे.
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक :-
मित्रांनो हा एक आफ्रिकन आणि आफ्रिका महाद्विपच्या मध्यभागी स्थित देश आहे. जवळजवळ 50 लाख लोकसंख्या असलेला हा देश जगातील सर्वात गरीब देश होण्याबरोबरच जगातील सर्वात भुकेलेला देश आहे. 2018 मधील ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्टनुसार (Global Hunger Index Report) पूर्ण जगामध्ये भूकमारी आणि कुपोषण हे आजार या देशात सर्वात जास्त आढळून येतात. येथील 62 टक्के पेक्षाही जास्त लोक गरिबीमध्ये जीवन जगत आहेत. येथील लोकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न आहे 48 हजार रुपये आहे. या बरोबरच येथील लोकांचे सरासरी आयुर्मान हे फक्त 52 वर्ष