
दैनिक चालु वार्ता
मुखेड ता. प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मुखेड तालुक्यातील गट विकास अधिकारी तुकाराम भालके साहेब सह तालुक्यातील १२९ ग्राम पंचायतीच्या ग्रामसेवकांच्या संविधान उद्देशिकेचे वाचन न केल्याच्या निषेधार्थ मुखेड मनसे व जनतेच्या वतीने जाहीर नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग , शासन परिपत्रक क्रमांक कर्ण २०२० / प्र.क्र .२५ / आस्था -५ दिनांक २२ जानेवारी २०२० च्या आदेशान्वे दि . २६ जानेवारी २०२० पासून ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ( जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्राम पंचायत ) दरवर्षी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधाना मधील उद्देशिका ( सरनामा ) यांचे सामुहीक वाचण करण्यात यावे असे शासन निर्णय आहे.
पण बहुतेक ठिकाणी त्याचे वाचन झाले नसल्याने त्या संदर्भात मनसे तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे यांनी दि . ०८/०२/ २०२२ रोजी तक्रार करून कळविले होते की , दि २६ जानेवारी २०२२ रोजी सर्व ग्राम पंचायत कार्यालय यांनी ध्वजारोहनापूर्वी सामुहिक संविधान उद्देशिकेची वाचन केले किंवा नाही , केलेल्या व न केलेल्या ग्राम पंचायतीची माहिती देण्यात यावी . अशा प्रकारची तक्रार दिल्यानंतर तात्काळ गट विकास अधिकारी साहेब यांनी खुप तळमळीणे या प्रकरणी बेजबाबदार ढोंगी दखल घेत सर्व ग्राम सेवकांना दि . २६ जानेवारी २०२२ रोजी ध्वजारोहनापुर्वी संविधान उद्देश पत्रीकेचे सामुहिक वाचन केले असल्या बाबदचा आव्हाल दिला आहे.
त्या सर्व १२९ ग्राम पंचायतीचे प्रमाणपत्र मला दिले . तेव्हाच त्या क्षणी असा कर्तव्य दक्ष व तळमळीचे निष्क्रिय गटविकास अधिकारी श्री तुकाराम भालके साहेब व तालुक्यातील सर्व खांदयाला खांदा लावून प्रत्येक आदेशाची खोटी कागदोपत्री तंतोतंत आमलबजावनी करणारे कर्तव्यदक्ष अशा ग्रामसेवक व , ग्राम विस्तार अधिकारी तसेच त्याचे सहकार्य अधिकारी कर्मचारी यांच्या ढोंगीपणाचे कौतूक करावे या उद्देशाने मनसेच्या वतीने वरील शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष . मा . काशिनाथ पाटील ( तहसिलदार मुखेड ) कार्यक्रमाचे उद्घाटक मा . विलासजी गोवाडे साहेब ( पोलीस निरीक्षक , मुखेड ) प्रमुख पाहूणे . मा . मॉन्टीसिंघ जाहगीरदार ( मनसे जिल्हाध्यक्ष , नांदेड ) मा . मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब ( जिल्हा परिषद नांदेड ) मा . प्रविणभाऊ मंगनाळे ( जिल्हा सचिव नांदेड ) मा . सुभाषभाऊ भंडारे ( मनविसे जिल्हा , नांदेड ) या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा . शफिकभाई ( मनसे शहराध्यक्ष , नांदेड ) मा . शंकुतलाताई प्रकाश पाटील हंगरगेकर( ग्रा.प.सदस्य हंगरगा ) व कार्यक्रमाचे आयोजक संतोष बनसोडे ( मनसे तालुकाध्यक्ष , मुखेड ) लक्ष्मण गवते ( विधानसभा अध्यक्ष , मुखेड – कंधार ) हारिदास दिंडे ( शेतकरी सेना अध्यक्ष , मुखेड ) राजकुमार हाळणीकर ( तालुका उपाध्यक्ष , मुखेड ) आरिफ पठाण ( ता . उपाध्यक्ष , मुखेड ) संघरक्षित गायकवाड हंगरगेकर (मा.उपसरपंच हंगरगा प क) व बंटी कांबळे , प्रकाशक – भाऊसाहेब गायकवाड ( राजसैनिक ) गजानन व्यंकटराव मामीलवाड ( शेतकरी सेना शहराध्यक्ष , मुखेड )
आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी सर्व नागरिकांनी या निष्क्रिय ढोंगी अधिकाऱ्याच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहवे असे आवाहन मुखेड मनसे तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे यांनी केले आहे.