
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
अटारी पुणे झोन-८ :- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथे ही शेतकरी महिलांसाठी “जागतिक महिला दिन” चे आयोजन करण्यात आले होते. महिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणिव करुन देणे तसेच सर्व समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे हा त्यामागचा मुख्य हेतु आहे. सदर जागतिक महिला दिन कार्यक्रमास प्रमुख उद्घाटक महत्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरीचे संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ.शरद गडाख, उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय धुळे हे होते. तसेच प्रमुख पाहुणे, डॉ.राहुल देसले,प्राचार्य,घटक कृषि तंत्र विद्यालय, प्रा.श्रीधर देसले, कांदा तज्ञ,वीवीके.धुळे, डॉ.दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक, कृविके, धुळे, श्रीमती. रेणुकाताई चव्हाण, नागली पापड उद्योजिका, धुळे, श्रीमती.ममता देशमुख, सदस्य,शेतकरी शास्त्रज्ञ, मंच, प्रा. अमृता राऊत, शास्त्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी प्रक्रिया,कृविके,धुळे,डॉ.पंकज पाटील, डॉ.धनराज चौधरी, श्रीमती प्राची काळे, श्रीमती.स्वप्नाली कौटे आदीमान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्तावीका मध्ये डॉ. दिनेश नांद्रे यांनी भारतातील कृषि क्षेत्रतील मनुष्यबळामध्ये ८० टक्के महिला असून ४० टक्के महिला या मजूरीचे काम करतात निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले. जागतिक महिला दिन 2022 च्या घोषवाक्याला अनुसरुन भविष्यतील शास्वततेसाठी आज स्त्री-पुरुष (लिंगभाव समानता) समानता अत्यावश्यक असल्याने सांगितले सोबतच कृषि विद्यान केंद्र, धुळे महिला सक्षमीकरणा साठी राबवित असलेल्या उपक्रमाविषयी माहिती अवगत करून दिली.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शनामध्ये डॉ.शरद गडाख,यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत, महिलांसाठी महत्मा फुले कृषि विद्यापीठाच्या योगदानाची महत्वपूर्ण माहती देऊन, सध्या राबवित असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच शेती पद्धतीमध्ये एकात्मिक शेती पद्धतीचे महत्व अधोरेखित करत, जास्तीत जास्त शेतकरी, महिला वर्गानी या पध्दतीचा अवलंब करून शाश्वत उत्पदानाकडे वाटचाल करावी असे आव्हान केले. तसेच कृषि विज्ञान केंद्र,धुळे महात्मा फुले कृषि विद्यापीठचे तंत्रज्ञान शेतकरी, महिला आदी पर्यंत प्रचार प्रसिद्धी चांगल्या प्रकारे करत आहे असे गौरव उदगार करून,कृषि विज्ञान केंद्राचे कौतुक केले, तसेच विद्यापीठाचे एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे अशी सूचना देखील केली.
तांत्रिक मार्गदर्शनामध्ये श्रीमती.अमृता राऊत यांनी कृषि प्रक्रिया क्षेत्रातील महिलांसाठी असलेल्या संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकरी महिलांसाठी तंत्रज्ञान” या मोबाईल अॅप वापरा विषयी त्यांनी उपस्थित महिलांसाठी प्रात्यक्षिक दिले. तसेच कृषि मधील लक्ष्मी मुक्ती योजना मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना या विषयी माहिती दिली. श्रीमती प्राची काळे यांनी कृषि प्रक्रिया बाजरी नानकटाई यावर प्रात्यक्षिका मधून मार्गदर्शन दिले. सोबतच सौ. रेणूका चव्हाण (पापड उद्योजिका), पाडळसे आणि सौ. ममता देशमुख (आवळा प्रक्रिया उद्योजिका), आमोदे यांनी स्वानुभव कथन करून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करताना डॉ.चिंतामणी देवकर, यांनी महिला घरातील जबाबदाऱ्यासांभाळून सर्वच क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करत आहेत तसेच महिलांनी संघटीत होवून काम केल्यास त्यांना कोणतेही काम अश्यक नाही असे नमूद करून महिलांना मार्गदर्शन केले.
राणी लक्षमीबाई, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, डॉ. रश्मी, कल्पना चावला, राहिबाई पोपरे, अशा यशस्वी महिलांचे दाखले देवून त्यांनी उपस्थित महिलांमध्ये ही अमर्यादित शक्ती असून त्यांना जागृत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.तसेच सौ. रेणूका चव्हाण (पापड उद्योजिका), पाडळदे आणि सौ. ममता देशमुख (आवळा प्रक्रिया उद्योजिका), आमोदे, कृषि महाविद्यालय, धुळे तसेच कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथील महिला कर्मचायांचा यथोचित सन्मान या प्रसंगी करण्यात आला.
सदर कार्यक्रमास गरताड, मुक्टी, न्याहाळोद, महाळपूर, चौगाव तसेच धुळे शहर येथुन बहुसंखेने शेतकरी महिला आणि विस्तार कार्यकरत्या आदी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.धनराज चौधरी तर आभार प्रदर्शन श्रीमती.
Bप्राची काळे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथील अधिकारी कर्मचारी श्री. जगदीश काथेपुरी, श्री. रोहित कडू, डॉ. अतिश पाटील, श्री. जयराम गावित, श्रीमती. स्वप्नाली कौटे, श्री. स्वप्नील महाजन, श्री. बाळू वाघ, श्री. रमेश शिंदे, श्री. कुमार भोये व श्री. मधुसूधन अहिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.