
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- मालिका विश्वात कधी कोणाच्या वाट्याला कोणती भूमिका येईल हे सांगता येत नाही.आज आई मुलाची भूमिका साकारणारे उद्या सासू जावई असतील किंवा दोन सख्खे मित्र पक्के वैरी असतील. आपल्याला दिलेली भूमिका चोख बजावणं एवढंच कलाकाराच्या हाती असतं. पण आज प्रियकर आणि प्रेयसीची भूमिका साकारणारे अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी एकेकाळी आई मुलाची भूमिका साकारली होती. यावर खरं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे..
तू तेव्हा तशी हि मालिका म्हणजे एक प्रेम कहाणी आहे. ‘ती’च्या साठी थांबलेला तो, आणि पहिला लग्न मोडल्यानंतर नव्याने तत्याच्या प्रेमात पडणारी ‘ती’… अशी वयाच्या चाळीशी गाठत आलेल्या मित्र मैत्रिणींची प्रेमकथा आहे. ही जोडी या निमित्ताने एकत्र आली असली तरी या आधीही त्यांनी एकत्र काम केले आहे. तुम्हला आश्चर्य वाटेल पण फार वर्षांपूर्वी या दोघांनी एकत्र काम केले होते, ते आई मुलाच्या भूमिकेत
‘हद कर दी’ या १९९९ मध्ये आलेल्या हिंदी विनोदी मालिकेत स्वप्नील आणि शिल्पा एकत्र दिसले होते. या मालिकेत स्वप्नीलने शिल्पाच्या मुलाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील एक फोटो सध्या व्हायरल झाला असून त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या मालिकेला सध्या चाहत्यांचे विशेष प्रेम मिळत आहे. शिल्पा आणि स्वप्नीलची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता त्यांच्या नात्यात काय नवीन घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे