
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
संभाजी गोसावी
औरंगाबाद :- औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे नूतन पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी माझी तत्कालीन पोलिस अधीक्षक निमित्त गोयल यांच्याकडूंन स्वीकारला पदभार. यावेळी निमित्त गोयल यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यांत ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असतील ते खपवून घेतले जाणार नाहीत ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असे सुरु असेल त्या प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा नवनियुक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी दिला.
नूतन पोलीस अधीक्षकांनी पदभार घेताच पोलीस अधीक्षकांची अचानक पाचोड पोलीस स्टेशन ठाण्यांला भेट घेऊन आढावा घेतला त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला पदभार घेत असताना विविध पोलीस स्टेशनला अचानक भेट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एसपींच्या अचानक भेटीमुळे पोलीस स्टेशनमधील प्रभारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ होत असल्यांचे दिसून येत आहे.