दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा
किवळा :- किवळा येथील कृषी सहाय्यक बर्डे मॅडम यांच्या कामचुकारपणामुळे किवळा सज्जा व परिसरातील गावातील अनेक शेतकरी कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणार्या योजना रखडल्या आहेत. लोहा तालुक्यातील सर्वात लांब पल्ल्याचा किवळा सज्जा आहे. बर्डे मॅडम कृषी सहाय्यक शेतकर्यांना भेटत नाहीत. फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे देतात. लोहा तालुका कृषी अधिकारी अरुण घुमनवाड हे कृषी सहाय्यक बर्डे मॅडम यांना पाठिशी घालून त्यांना सहकार्य करतात. शेतकर्यांना बर्डे मॅडम यांच्या विषयी माहिती विचारली असता, उडवाउडवीची उत्तरे देतात. व त्यांना साथ देतात. सामाजिक कार्यकर्ते श्री. अवधूत पवार (आम आदमी पार्टी नांदेड ) यांनी बर्डे मॅडम यांची बदली करा अन्यथा कृषी अधिकारी यांना नोटिस देऊन आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. खरीप हंगाम जवळ आला असून कृषी सहाय्यकांनी शेतकर्यांना खरीप नियोजनाची कुठलीच माहिती शेतकर्यांना दिलेली नाही. नांदेड जिल्हा कृषी अधिकारी यांनी या प्रकरणाकडे वेळीच लक्ष देऊन किवळा सज्जातील शेतकर्यांना सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले आहे.