दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : – पाकिस्तानची अर्थव्यवस्था गतीने दिवाळखोरीच्या दिशेने निघालेली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत २०० पर्यंत पोहचली आहे . गुरुवारी एका डॉलरच्या बदल्यात पाकिस्तानला २०० रुपये द्यावे लागतील . याबरोबरच डॉलरचे ब्लॅक मार्केटिंगही वाढले आहे आणि हे रोखण्यात पाकिस्तानी सरकार अपयशी ठरताना दिसते आहे . सरकारने लक्झरी आणि गरजेच्या नसलेल्या चैनीच्य व्सतुंची आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .
डॉलर पाकिस्तानी २०० रुपयांपर्यंत
फॉरेक्स असेसिएशन ऑफ पाकिस्तान आणि बिझनेस रेकॉर्डर पाकस्तानने बुधवारी रात्री जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार , पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत १९९ रुपयांपर्यंत पोहचला होता . गुरुवारी तो अधिक पडेल अशी शक्यता आहे . ११ एप्रिल रोजी जेव्हा शहाबाज शरीफ यांचे आघाडीचे सरकार सत्तेत आले होते तेव्हा डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया १८२वर होता . इम्रान सरकारने परदेशी कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत आणि नव्या सरकारला हे हप्ते भरणे सध्यातरी अवघड दिसते आहे . दुसरीकडे देशात श्रीनंत लोकांकडे मोठ्या प्रमाणात डॉलर्स आहेत , त्यामुळे ब्लॅक मार्केटिंग सुरु झाले आहे . एका डॉलरच्या बदल्यात ब्लॅक मार्केटिंगमध्ये २६० पाकिस्तानी रुपये द्यावे लागत आहेत .
आता आयएमएफच्या मदतीकडे लक्ष
पाकिस्तानचा १९ वा आयएमएफ कार्यक्रम इम्रान सरकार पडण्यापूर्वीच अडकले आहे . आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानातील अर्थव्यवस्था सुधारा , असा सल्ला पाकिस्तानला दिला होता . असे झाले नाही तर सर्व सबसिडी बंद करण्यात येईल असेही सांगण्यात आले होते . यासाठी इंधनांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजाराच्या किमतीप्रमाणे आणा आणि वीज महाग करा असे सांगण्यात आले होते .
इम्रान सरकारने हे ऐकले नाही . सरकार पडेल या चिंतेने त्यांनी इँधन १० रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय़ घेतला . त्यामुळे आयएमएफने निधी देण्यास नकार दिला . आता शहबाज शरीफ पुन्हा एकदा आय़एमएसमोर मदतीसाठी हात पसरत आहेत . पण सध्याची अस्थिर राजकीय स्थिती पाहता आयएमएफ काही मदत करेल , अशी आशा नसल्याचे सांगण्यात येते आहे . परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो सध्या अमेरिकेत आले आहेत . जर अमेरिकन सरकारने यात हस्तक्षेप केला तर काही अटींवर पाकिस्तानला काही निधी मिळण्याची शक्यता आहे .