दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
शासनाने प्रतिबंधीत केलेल्या विविध कंपन्याच्या गुटख्याची हिमायतनगर शहर व परिसरात खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पी. टी.चव्हाण यांना कळताच त्यांनी हिमायतनगर ते सवणा जाणाऱ्या रेल्वे अंडर ब्रीज जवळ एका आयचार ट्याम्पु ने भरून जात असलेला 15 लाख 80 हजाराचा गुटखा हिमायतनगर पोलीस प्रशासनाच्या नाका वर टिच्चून एल.सी.बी. च्या शोध पथकाने आज दि.18 ऑक्टोंबर रोजी दुपारी 15:46 वाजता धडाकेबाज कार्यवाही करून अंदाजे 15 लाख 80 हजाराचा गुटखा जप्त केला आहे.
कोरोना काळापासून हिमायतनगर शहरातील बऱ्याच व्यावसायिकांना ‘बुरे दिन’चा सामना करण्याची वेळ आलेली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र कधी नव्हे असे ‘अच्छे दिन’ तालुक्यात बघायला मिळाले आहे लॉकडाउनच्या काळापासून शहरात चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री खूप मोठ्या धडाक्यात सुरू असल्याची माहिती हिमायतनगर येथील स्थानिक पोलिस व अन्न औषध प्रशासनास माहित असून सुद्धा त्यांच्या कडून कुठल्याच प्रकारची कार्यवाही पहायला मिळत नाही शहरातील चौपाटी, बाजार चौक, व उमर चौक परिसरात गुटख्याची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते तरी पण येथील पोलीस प्रशासन ह्यावर कुठलीही कार्यवाही करत नाही त्यामुळे हिमायतनगर वरून सवणा जाणाऱ्या रोड वरून अवैध गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त चरा कडून माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर पथकातील अधिकाऱ्यांनी एका गाडीत असलेल्या अंदाजे 15 लाख 80 हजारांच्या गुटख्यावर छापा टाकून कार्यवाही केली यामध्ये विमल व नजर अशा विविध उत्पादन कंपण्याचा गुटखा असल्याचे पोलिसान कडून सांगण्यात आले. याप्रकरणी हिमायतनगर पोलीस स्थानकात आरोपी विरुद्ध गु. र. न.248/21,कलम 26(2)27 अन्न सुरक्षा मा. न. के.2006, स.क.2011 स.क.30(2) अ 59(आय बि.) व कलम 188,272,273,328 प्रमाणे भा.द.वी.गुन्हा दाखल करण्यात आला व ह्या घटनेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन सोनवणे, पि. टी.चव्हाण पोलीस उप निरीक्षक हे करीत आहेत
—————————————————————————–
चौपाटी परिसर गुटखा विक्रीचे हॉटस्पॉट केंद्र बनत आहे ?
शहरातील चौपाटी ,बाजार चौक परिसरात गुटखा माफियांचे अड्डे लॉकडाउनच्या काळापासून राजरोस पने सुरूच आहेत आणि आजही दिवसाढवळ्या गुटख्याची बिनधास्त विक्री सुरू आहे. राज्यात गुटखाबंदी असल्याने वाहतूक व विक्री ही चोरट्या मार्गानेच होते.हिमायतनगर शहरालगत असलेल्या अनेक भागात गुटख्याचा साठा करण्याचे ठिकाणे आहेत असे जनतेतून सांल्या जाते काही व्यापारी तर गुटख्याची मोटारसायकलींने ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत.तरी पण पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का ? बसले आहे असा असे शहरातील सुजाण नागरिक बोलत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या बाबी कडे लक्ष देऊन अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी.जनतेतून होत आहे