दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
खैरा (नांदुरा)दि.२९. वीर सावरकर सार्व.वाचनालय खैरा येथे राजा राममोहन राय यांच्या जयंतीनिमित्त आधुनिक शेती विषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकरी बाळकृष्ण पाटील लाभले होते. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून केशवराव मापारी नवनिर्वाचित तालुकाअध्यक्ष संजय गांधी निराधार योजना हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्टनागरिक भिमराव मापारी हे होते.कार्यक्रमाची सुरुवात राजा राममोहन राय यांच्या प्रतीमेला हार अर्पण व ग्रंथ पुजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मापारी सर यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ.गणगे यांनी केले.वाचनालयाचा वतीने मान्यवरांचा ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला. बाळकृष्ण पाटील कंडारी यांना शासनाचा उतक्रूष्ट शेतीनिष्ट पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल त्यांचा शाल,श्रीफळ व ग्रामगीता भेट देऊन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.गणगे व सदानंद मानकर यांनी सत्कार केला. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष केशवराव मापारी यांचा सत्कार वाचनालयाच्या वतीने मापारी सर,व लिपीक संदीप गणगे यांनी शाल,श्रीफळ व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे बाळकृष्ण पाटील यांनी आधुनिक शेतीबद्दल माहिती दिली. व वाचनालयातील शेती विषयक पुस्तकाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले. तसेच केशवराव मापारी यांनी वाचनालय राबवित असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भिमराव मापारी यांनी अध्यक्षीय भाषणात गावकऱ्यांनी आपल्या वाचनालयातील ग्रंथ संपदेचा लाभ घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप गणगे यांनी केले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप गणगे, दिपक गणगे, पत्रकार लहुजी गावंडे, नामदेव नेमाने गुरुजी,दिलु कावने रामदास मापारी,राजु मापारी, बळीराम सरोदे, जूलालसिग सोळंके, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला गावकरी व बहुसंख्य वाचक वर्ग ऊपस्थीत होते.