दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ७५ व्या वर्षात पदार्पण करीत असून या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जव्हार आगारातून जव्हार-सेलवास-वापी-नवापूर मार्गे नंदुरबार या मार्गावर आजपासून नवीन फेरी सुरू करण्यात आलेली असून जव्हार आगारा मार्फत या चालू केलेल्या नविन मार्गावरच्या प्रवाशांनी प्रवास करण्याचे आवाहन जव्हार आगार आगाराकडून करण्यात येत आहे.सकाळी ०९.०० वाजता जव्हार बसस्थानकातून ही बस मार्गस्थ होणार असून संध्याकाळी ०७:०० वाजण्याच्या सुमारास नंदुरबार बस स्थानकात या बसचे आगमन होईल.
दरम्यान महाराष्ट्राची जीवनवाहिनी तसेच ग्रामीण महाराष्ट्राची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामंडळाच्या लालपरीची गेली कित्येक वर्ष अविरत सेवा अखंडितपणे सुरू आहे.या अमृत महोत्सवी वर्षाच्या वर्धापनदिनी जव्हार आगारात आगाराचे आगार व्यवस्थापकांच्या उपस्थित केक कापून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व जव्हार आगाराकडून प्रवासी बांधवांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी आगाराचे आगार व्यवस्थापक,वाहतूक नियंत्रक,एसटी महामंडळ जव्हार आगाराचे कर्मचारी तसेच प्रवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते