दैनिक चालु वार्ता आर्णी प्रतिनिधी- रमेश राठोड
सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा सारख्या दुर्गम परिसरातून अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या बाबाराव राठोड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती, विशेष म्हणजे त्यांची पत्नी सुद्धा पोलीस या पदावर कार्यरत आहेत सौ.वर्षा बाबाराव राठोड नागपूर ग्रामीण पोलीस यांचे लहान बंधू हिरासिंग रामलाल राठोड शिक्षक यवतमाळ या पदावर कार्यरत आहे व पत्नी सौ विजया हिरासिंग राठोड वरिष्ठ लिपिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे कार्यरत आहे एक गरीब कुटुंबातील शिक्षणाच्या जोरावर एका कुटुंबातील 4 जन शासकीय शासकीय सेवेत कार्यरत असून आम्हाला या पदा पर्यंत पोहोचवण्याचे काम ज्या व्यक्तीने केला नशिबाने तो व्यक्तीआज आमच्यात नाही स्व. मोतीलाल रामलाल राठोड आमचे आधारस्तंभ व्यक्तीने आम्हाला समाजामध्ये सर्व शासकीय सेवेत पोहोचवण्याचं काम त्या व्यक्तीने केला आहे परंतु ईश्वरा हे मान्य नव्हते आमचे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय मोतीलाल भाऊ यांना शिक्षणाचा फार महत्व होता आपल्या लहान बंधू शिकण्यासाठी यवतमाळ येथे पाठवले त्यांना कोणत्याच गोष्टीची जाणीव न होऊ देता तुम्ही शिक्षण घ्या तुम्हाला शिक्षणासाठी मी कुठेही कमी पडू देणार नाही तुमचं कार्य तुम्ही चालू ठेवा माझी करते मी पूर्ण करतो असा ठाम विश्वास देणारा ज्येष्ठ बंधू मोतीलाल यांना त्यांच्या कुटुंबातील सर्व सभासद आमचे आधारस्तंभ आहे असे समजले जाते आणि आज संपूर्ण कुटुंब आज शासकीय सेवांमध्ये आपली सेवा देत आहे त्यातच बाबाराव राठोड हे शिक्षणाची फार आवड असल्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षण यवतमाळ येथे घेतले अभ्यासाची जिद्द अंगी बाळगून त्यांनी बीए फायनल इयर पूर्ण केले योगायोगाने पोलीस भरती निघाली आपल्या पहिल्या भरती मध्ये उत्कृष्ट प्राविण्य प्राप्त करून ही पदवी प्राप्त केली आज रोजी त्यांनी आपल्या भरोशावर पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांचे श्रेय हे आपल्या आई-वडिलांना आणि पित्या सन्मान आपल्या भावाला देतो आम्ही जे काही आहोत ते आमच्या भावामुळे चाहो अशी कबुली ते प्रांजळपणे मान्य करतो असाच जेष्ठ बंधू सगळ्या भावांना मिळावा अशी अपेक्षा करतो