दै चालु वार्ता वृत्तसेवा
कार्यकारी उप संपादक
भरत पाटील पवार
कंधार / लोहा : कंधार लोहातील गरिबांचे कैवारी, लोकनेता, समाजसेवक असे अनेक उपादी दिल्या तरी ज्यांच्यासाठी कमीच आहेत. असे लोक नेते आणि बीजेपी या सत्तारुढ पक्षाचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे गटनेते माननीय श्री एकनाथ दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे 23 ऑक्टोबरला भव्य अभीष्टचिंतन सोहळा व नौकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी व नौकरी महोत्सवासाठी एकनाथ दादा कडून कंधार लोहा तालुक्यांमधील तमाम जनतेनां उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच दादांनी स्वतःच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कंधार व लोहा तालुक्यांमधील हजारो बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा संकल्प केला आहे. यापूर्वी पण दादानीं कंधार व लोहा तालुक्यातील 10000 युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याच दिलदार पणाला आणि गरिबीची जाण असलेल्या एकनाथ दादांना कंधार लोहा तालुक्यातील हजारो युवक त्यांना आपले आदर्श मानतात. कंधार लोहा तालुक्यातील हजारो युवकांनी दादांना कंधार लोहा तालुक्याचा भावी आमदार म्हणून संबोधलं आहे. कंधार लोहा तालुक्यातील सर्व थरातील लोक हे दादाच्या खंबीरपणे पाठीशी असल्यामुळे दादांना नेहमी कंधार लोहा तालुका साठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते आणि ते करून पण दाखवत आहेत. त्यामुळे स्वतः एकनाथ दादांनी दोन्ही तालुक्यातील तमाम जनतेना आणि युवकांना 23 ऑक्टोबर 2021 अभिष्ट चिंतन सोहळा व नौकरी महोत्सवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.