दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सुतार वस्ती शाळा दोन वर्षानंतर प्रथम सुरू झाल्यामुळे टणु गावचे पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भिवंडी शहर पोलीस निरीक्षक विक्रम गुलाबराव मोहिते
यावेळी बोलत आसताना म्हणाले की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन आम्ही आज पोलीस निरीक्षक या पदावर गेलो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेऊन आपला पाया मजबूत करावा आसे आव्हान या वेळी पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी शेंडे यांनी केले कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, व माजी सरपंच संतोष सुतार, भागवत सुतार, हरिभाऊ सुतार, चंद्रकांत सुतार,आप्पासाहेब सुतार गुलाबराव मोहिते, आरूण बोडके , भारत सुतार, संजय नरुटे, पोपट सुतार, दिपक बोडके, शहाजी बोडके, कल्याण बंडलकर, शशिकांत सुतार,भाग्यवंत नरुटे, , सौरभ सुतार, नंदु सुतार, हनुमंत गायकवाड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन महेश सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शन .गौरी राहुल सुतार यांनी केले.