
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
आमदार रवी राणा यांच्या विरोधात अमरावती पोलिसांनी केले जमीनपात्र अटक वॉरंट जारी!
मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या दरम्यान हनुमान चालिसा प्रकरणी चर्चेत आलेले अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
आमदार रवी राणा यांच्या विरोधात अमरावती पोलिसांनी जमीनपात्र अटक वॉरंट जारी केले असून रवी राणांच्या मुंबईतील घरी पोलीस पोहचल्याची माहिती समोर येत आहे.
अमरावतीच्या आयुक्तांवर रवी राणा यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याप्रकरणी हे अटक वॉरंट काढण्यात आले. आज संध्याकाळी पाच ते सहा पोलीसांचे एक पथक रवी राणांच्या घरी पोहचले होते, दरम्यान आमदार रवी राणांच्या घरी कोणी नसल्याने हे वॉरंट कोणीही स्वीकारले नाही अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी फक्त दोन दिवस उरलेले असल्याने आमदार रवी राणांविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार तर्क वितर्क लढवले जात आहेत.