
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी – पंकज रामटेके
दि.२१ जुन २०२२ मंगळवार रोजी घुग्घुस गांधी चौक येथे ड्रॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचा उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेचा फायदा शहरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाचनप्रेमींना निश्चितच होईल.
‘वाचाल तर वाचाल’ असा मंत्र सांगितला जातो, ते उगीच नाही. बौध्दीक आणि सामाजिक विकासासाठी पुस्तकांचे आणि वाचनालयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा केवळ उक्तीतून उद्घोष न होता ती कृतीतून प्रत्ययास आणण्याचे कार्य पुस्तकांच्या रुपाने होऊ शकते. आजच्या पिढीवर असे संस्कार करण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही. असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
उद्घाटनप्रसंगी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुका महामंत्री विजय आगरे, विनोद चौधरी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, ऋषी कोवे, सुरज तोतडे, महादेव पाझारे, रत्नेश सिंह, राजकुमार गोडशेलवार, बाळकृष्ण झाडे, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, रजत तुराणकर, कांपा राजा, चंद्र तालांसह आदी मंडळी उपस्थित होते.