
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मधील हजारो आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणारे श्री.सोपान मोरे व ओबीसी चे नेते श्री .ज्ञानदेव शिंदे यांच्या वतीने आळंदी येथे मोफत पोहे आणि चहाचे वाटप करण्यात आले.श्री.ज्ञानदेव शिंदे यांनी सांगितले की हि वारकऱ्यांची सेवा आणि अन्नदान हे प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करत असतो आणि यापुढेही कायम करत राहू.हि सेवा करताना खुप आनंद आणि समाधान मिळते.यावेळी इतरही काही पदाधिकारी व परिवार उपस्थित होते.