
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
प्रवेश घेण्याचे युवकांना आवाहन
जव्हार:- ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना तसेच महाविद्यालयीन तरुणांना आपल्या शिक्षणा सोबतच स्वरोजगार तसेच उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना संशोधक व ग्रामीण उद्योजक निर्मितीच्या उद्देशाने तालुक्यातील श्री जयेश्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट हायस्कूल येथे विज्ञान आश्रम(पाबळ)पुणे आणि प्रगती प्रतिष्ठन जव्हार यांच्या संयुक्त विद्यमानाने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून ग्रामीण भागातील युवकांना आर्थिक प्राप्तीसाठी व्यवसाय क्षेत्रांमध्ये गवंडी,इलेक्ट्रिशन,वेल्डर,संगणक अशा व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन एकाच वर्षात एकाच वेळी तीन-चार प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती या प्रशिक्षणा वेळी देण्यात आली.
विशेष म्हणजे या विज्ञान आश्रम हे “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्कूल दिल्ली” भारत सरकारचे मान्यताप्राप्त मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञान पदविका असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करताना आपले कौशल्य पूर्ण करण्याची संधी असल्याचे मत विशाल जगताप यांनी शिबिरात मार्गदर्शन करताना केले.या शिबिरात प्रशिक्षण केंद्रात शेतीला पूरक आणि जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन,शेळीपालन,जैविक खते उत्पादने,गांडूळ खत निर्मिती,शेती मोटार पंप दुरुस्ती अशा प्रकारचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण युवकांना अर्थ निर्मिती कशी करता येईल या दृष्टीने विज्ञान आश्रमाचा पुढाकार आहे. या प्रशिक्षणा प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नरेश मराड,सुनिल वार्ता,प्राची चंपानेकर उपस्थित होते.