दैनिक चालु वार्ता
पन्हाळा प्रतिनिघी शहाबाज मुजावर
पन्हाळा विध्या मंदिर हायस्कुल व कळे विध्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या दोषी संचालक मंडळच्या संचालका वर कायदेशीर कारवाई करणे बाबत निवेदन
पन्हाळा विध्या मंदिर हायस्कुल व कळे विध्या मंदिर व ज्युनियर कॉलेज या संस्थाच्या संचालक मंडळाने आपल्या दोन्ही शाखेत विद्यार्थी वाहतूक करण्या साठी वाहन घेतले असून प्रशासनाने दिलेल्या वाहतूक नियमावाली चे उलनघन या ठिकाणी होत आहे . प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती आसने गरजचे असतानाही अशी कोणतीही समिती नियुक्त केली नसुन प्रशासनाने घातलेले नियम पायदळी तुडवून भारत देशाचे भविष्य असणाऱ्या विध्यार्था च्या जीविताशी खेळ करुन वाहतूक केली जात आहे . त्याच प्रमाणे या संस्थेत कार्यरत असणारे शिक्षक व कर्मचाऱ्या ची आर्थिक व मानसिक पिळवणूक व हीन दर्जाची वागणूक संचालक मंडळा कडून दिली जात आसून . जातीवादाची संकल्पना ही कसोशीने जोपासली आहे या साठी अनेकांना वेठीस धरण्याचे प्रकार गेले कित्येक वर्षे सुरू आहेत . ज्या पन्हाळा विध्या मंदिर चे नाव हॉलीबॉल या खेळाने महाराष्ट्रात च नव्हे तर देश पातळीवर पोहचवले आजच्या घटकेला या खेळाचे परिपूर्ण ज्ञान असणारा एकही शिक्षक या शाळेत नसल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्याना इतर शाळेत घातले आहे . याची जाणीव संचालक मंडळाला असताना ही जाणून बुजून पट संख्या कमी करण्यासाठी हे सर्व प्रामाणिक प्रयत्न या संचालक मंडळा कडून केले जात आहेत . हे सर्व प्रयत्न पन्हाळा हायस्कुल कोणाच्या घशात घालण्या साठी केला जात आहेत . या संस्थेचे कळे ज्युनियर कॉलेज विभागातिल कॉमर्सच्या विध्यार्थाना शिक्षण देण्यासाठी नियुक्त केलेले काही शिक्षक हे या विभागाच्या विध्यार्थी चे शैक्षणिक नुकसान करणासाठी नियुक्त केले आहेत . हे सर्व प्रकार संचालक मंडळ कोणता उद्देश व हेतू ठेवून ही कार्य करीत आहेत . राजेशाही व हुकूमशाहीचा मनमानी कारभार करणाऱ्या या संचालकान ची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या संचालकांन वर तत्काळ कायदेशीर कार्यवाही करावी . अन्यथा राष्ट्रीय बहुजन महासंघा कडून तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल . व त्या नंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुवेव्यस्थेला पंचायत समिती पन्हाळा प्रशासन जबाबदार राहील.सदरच्या निवेदनाचा गांभिर्याने विचार व्हावा ही विनंती .असे निवेदन राष्ट्रीय बहुजन महासंघ अघ्यक्ष राजीव सोरटे ( दादा ) यांनी मा .गटविकास अधिकारी यांना दिले तसेच त्या निवेदना वर तुकाराम कांबळे उपाघ्यक्ष सतिश कासे शितलकुमार गंवडी अमर सलगर आदी च्या सह्या आहेत