
दैनिक चालु वार्ता वानोळा सर्कल प्रतिनिधी -अजय चव्हाण
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांची १ जुलै रोजी १०९ वी जयंती आणि कृषि विधापीठ नामांतराचा ९ वर्धापन दिन बंजारा,भटके विमुक्त,ओबीसी आणि बहुजन समाज बांधवाने उत्साहाने साजरा करावा असे आवाहन गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड (नायक) यांनी केला आहे.
या संदर्भात वासुदेव राठोड म्हटले आहे की,एका तांडयात जन्माला आलेल्या वसंतराव नाईक साहेबांनी शेती आणि शेतकरी हेच केंद्र बिंदू म्हणून राजकारणात सुरुवात केली,पुसद नगर परिषदेचे नगरध्यक्ष ते महाराष्ट्रचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला.महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहण्याची संधी त्यांना मिळाली .
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचे कार्य हे शब्दांत व्यक्त करता येणार नाही ऐवढे मोठे काम त्यांनी केले होते,रोजगार हमी योजना सारखी गोर गरिबांच्या मदतीसाठी सर्वात अगोदर योजना राज्यात पहिली राबवली,जायकवाडी,कोयना सारखे मोठे प्रकल्प उभे करून शेतकरी बळीराजाला सुजलाम सुफलाम बनविले.शेती सोबतच औद्योगिक क्षेत्र विकसित करणारे राज्यातील एकमेव मुख्यमंत्री होऊन गेले.शेतकर्यांच्या जिवनात क्रांती घडावी त्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करावी म्हणून चार कृषि विघापीठाची स्थापना केली.राज्यात १९७२ साली भिषण दुष्काळ पडला असतांना लोकांना जिवदान दिले.नाईक साहेबांनी सामाजिक ,शैक्षणिक ,क्षेत्रात वंचित लोकांनी प्रगती करावी म्हणून शेवट पर्यंत प्रयत्न केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा मरणोतर सन्मान व्हावा या साठी परभणी कृषी विघापीठाला त्यांचे नाव देण्यात यावे यासाठी नामांतर चळवळ उभी केली आणि पधंरा वर्षे लढा दिल्यांनतर १ जुलै २०१३ ला नामांतर करण्यात आले.या करिता राज्यातील तमाम बंजारा,भटके,दिन दलित ओबीसी बहुजन समाज बाधंवाने १ जुलै रोजी आधुनिक महाराष्ट्रचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांची जयंती आणि नामांतराचा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करावा आणि आपला स्वाभिमान जिवंत ठेवाचा असे शेवटी आव्हान वासुदेव राठोड यांनी केला आहे.