दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- पेठवडज सर्कल मधील आय. एस. ओ. नामांकन प्राप्त करणारी पहिली ग्रामपंचायत कार्यालय देवईचीवाडी ठरली असून कंधार तालुक्यातून पहीला येणाचा मान मिळाला आहे. आय. एस. ओ. नामांकनासाठी रेकॉर्ड नमुना नंबर १ ते ३३ परिपूर्ण व आॅनलाईन असावे लागते. ग्रामपंचायतीचे सर्व दाखले व प्रमाणपत्रे मिळायला हवीत. भौतिक सुविधा उपलब्ध असाव्या लागतात. ग्रामपंचायत ईमारत व परीसर सुंदर, स्वच्छ व बोलके असलेले पाहिजे. वरील सर्व प्रकारच्या बाबी पूर्ण केल्यानंतर या सर्वांचे आॅडीट होते. त्यानंतर नामांकन दर्जा प्राप्त होतो. या सर्व बाबीची पुर्तता केल्यानंतर आय. एस. ओ. दर्जा प्राप्त होतो. या सर्व प्रकारच्या पुर्तता ग्रामपंचायत कार्यालय देवईचीवाडीने केले असून आय. एस. ओ. प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक या सर्वाचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. देवईचीवाडीच्या ग्रामपंचायतीमुळे पेठवडज सर्कलला कंधार तालुक्यातून पहीला येणाचा मान मिळाला आहे. सर्वत्र देवईचीवाडीच्या ग्रामपंचायतीचे कौतुक केले जात आहे.