दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
.
‘गंगागिरी’ महाराज १७५ व्या सप्ताह सोहळ्यास ऐतिहासिक मिरवणूकीने प्रारंभ
कोकमठाण रानमाळावरअवतरली “प्रति- पंढरी”……
गंगापूर – वारकऱ्यांचा महा कुंभ समजला जाणारा आशियाा खंडातील सर्वात मोठा गिनीज बुकमध्ये नोंद असलेला १७५ वा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आज मंगळवारदि. २ऑगस्ट रोजी कोकमठाण तालुका कोपरगाव या ठिकाणाहून सकाळी१० वाजता सजविलेल्या अश्वरथातून सराला बेटाचे अधिपती महंत रामगिरी महाराज यांची हात्ती,घोडे,उंट, ढोलताशा, लेझिम व झांज पथकाच्या गजरात सनई- चौघड्याच्या निनादात गावातील भजनी मंडळाच्या सुश्राव्य अभंगवाणीत सप्ताहस्थळापर्यंत भव्य ऐतिहासिक मिरवणूक निघाली होती .
यावेळी रस्त्यावर जागोजागी ऐतिहासिक देखावे, ग्रामस्थांचे रामायणातील देखावे हे भाविकांचे आकर्षण होते . शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समाज प्रबोधनात्मक देखावे व पथनाट्यांचे सादरीकरण भाविकांच्या नियोजनातून करण्यात आले. मिरवणूक मार्गावर कोकमठाण शिवारातील माळरानावर कलशधारी सुवासिनी,तुळशीवृंदा महिला,संतमेळा व सहभागी पथकांचा रिंगण सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला .
मिरवणूक भजन मंडपात पोहचताच महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते अखंड यज्ञ प्रज्वलित करून ,सद्गुरु गंगागिरी महाराज ,ब्रम्हलिन नारायणगिरी महाराजासह सर्व संताच्या प्रतिमाचे पुजन , विणापुजन करुन पंचपदी गायनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी महंत रामगिरी महाराज म्हणाले की,अखंड हरिनाम हा तपस्या यज्ञच असुन गंगागिरी महाराज हे निष्काम सन्याशी होते,त्यांच्या परंपरेतील हे कार्य बेटाचे सेवक म्हणून आम्ही पुढे नेत आहोत,अहोरात्र अखंड भजन पाहील्यावर नक्कीच येथे पंढरीचा पांडुरंग व प्रतिपंढरी आवतरल्या शिवाय रहाणार नाही , फक्त भक्ती करताना ती निस्वार्थ अंतकरणाने केली पाहिजे .सद्गुरुच्या कृपेने सप्ताह पार पडू दे व शेतकरी सुखी होऊदे अशी प्रार्थना याप्रसंगी महाराजांनी केली .
यावेळी प्रमुख उपस्थितीत आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे विवेक भैय्या कोल्हे सुरेश थोरात, बाळासाहेब कापसे, अशोक शेठ बोर्हाडे, शिवाजी ठाकरे ,ज्ञानेश्वर टेके, भाऊसाहेब झिंजुर्डे, भाऊलाल सोमासे,सरालााा बेटाचे. विश्वस्त मधुकर महाराज , दत्तू पाटील खपके, नंदू निकमआदीसह बेटाचे विद्यार्थी शिष्य महाराज मंडळी, भाविकांसह लाखो भाविकांची उपस्थिती होती .
पहिल्याच दिवशी मांडे व पुरणपोळीचा महाप्रसाद- सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहात दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी कोपरगाव,येवला,नांदगाव,वैजापूर व सप्ताह पंचक्रोशितील गावानी मांडे व पुरणपोळी आणि निर्जंतुक केलेल्या २० हजार लिटर दुधाचा महाप्रसाद वाटप केला .आज पहील्याच दिवशी तीन ते चार लाख भाविकांची उपस्थिती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. सप्तााह कालावधीत सुमारे 25 ते 30 लाख भाविक सप्ताह भेट देत असतात. दररोज सुमारे दिडशे ते दोनशे गावातील भाकरी व लाखो लिटर आमटीचा महाप्रसाद वाटप होत असतोो. याा सप्ताहाची सांगता नऊ ऑगस्ट रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होईल.