दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संस्मरणीय बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार अमित शहा यांनी आज त्यांच्या सर्व समाजमाध्यम खात्यांचे प्रोफाइल छायाचित्र म्हणून तिरंगा ठेवला
राष्ट्रध्वजाप्रति आपले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी मी प्रत्येकाला आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील खात्यांच्या डीपीवर तिरंगा ठेवावा – अमित शाह
नवी दिल्ली :- देशवासीयांनी आपल्या समाजमाध्यमावरील खात्यांचा डीपी बदलून त्याजागी तिरंगा ठेवावा असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले आहे. ट्विटच्या माध्यमातून अमित शाह यांनी सांगितले की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संस्मरणीय करण्यासाठी मी माझ्या सर्व समाजमाध्यमावरील खात्यांच्या प्रोफाइल छायाचित्रावर तिरंगा ठेवला आहे.”
अमित शाह म्हणाले की, “राष्ट्रध्वजाबद्दल तुमचे प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की, तुमच्या समाजमाध्यमावरील खात्यांचा डीपी बदलून तिरंगा ठेवा.”