दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
रविवारी(दि.३१जुलै) रात्री दहा वाजताच्या सुमारास येथील हेमंत गाडेकर यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती या आगीत गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याने गराचे व घरातील वस्तूंचे जळून खुप नुकसान झाले आहे.
या जळीत घराची पाहणी सोमवारी वाडा तालुक्यातील शिवसैनिकांनी पाहणी केली.
या घडलेल्या दुदैवी घटनेमुळे पुर्णत नुकसान झालेल्या घराचा योग्य पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी गोऱ्हे येथील विद्युत वितरणच्या कार्यालयास बभेट दिली,
याप्रसंगी शिवसेनेचे पालघर लोकसभा सहसंपर्कप्रमुख निलेश गंधे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.