दैनिक चालु वार्ता साक्री/धुळे प्रतिनिधी:
दिनांक २९जुलै २०२२ रोजी शासकीय आश्रमशाळा राईन पाडा येथे बालविवाह प्रतिबंधात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, पूर्वीच्या काळात बालविवाह करणे ही प्रथा प्रचलित होती ,या मुळे लहान वयातच मुलीवर घरादाराची जबाबदारी पडायची यात शिक्षणाचा अभाव कमी असल्याने स्त्रीला फक्त आणि फक्त चूल आणि मूल हे माहीत होते, अठराशे च्या काळात भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते स्त्री शिक्षणाचे आणि बहुजनांचे उद्धारक सत्यशोधक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बालविवाह प्रथा बंद करणारे ,पुनर्विवाह चे पुरस्कर्ते अनिष्ठ रूढी परंपरा अंधश्रद्धा याचे विरोधात बंड पुकारणारे पहिले प्रसिद्ध विचारवंत लेखक, साहित्यिक व संपादक क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पत्नी माता सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बालविवाह प्रतिबंधात्मक समुपदेशक कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री एस. पी. जाधव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री भैय्या सर ,व श्रीमती एस.सी.गांगुर्डे ANM मॅडम
श्रीमती अवंतीबाई सुकलाल कामडे.अंगणवाडी कार्यकर्ती अंगणवाडी मदतनीस मीराबाई कामडे तसेच मा शिक्षिका जे,एम अहिरे,मॅडम बागुल मॅडम , या कार्यक्रमाच्या मुख्य प्रवर्तक स्त्री अधिक्षिका श्रीमती एस,डी, सूर्यवंशी आदीनी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राईन पाडा ता साक्री जिल्हा धुळे येथील विध्यार्थीनींना बालविवाह बदल सखोल असे मार्गदर्शन केले, मुलीनी बालविवाहाच्या विरोधात उतरणे ही काळाची गरज असून मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करावा ,असे ही ह्या कार्यक्रमाच्या विचार मंचाच्या विचार पिठावरून सुचवण्यात आले , या कार्यक्रमाला राईन पाडा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विध्यार्थीनीं मोठ्या संख्येने हजर होत्या