दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
रांधे ता. पारनेर:-येथील ३० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण प्रसंगी सभापती काशिनाथ दाते सर बोलत होते. मी आजपर्यंतच्या राजकारणात समाजकारणात लोकांचे काम करण्याचे ठरवले आहे. मी कै. शंकरराव काळे साहेबांपासून अनेक दिग्गजांच्या बरोबर काम करत असताना कै. वसंतराव झावरे पाटील व माजी आमदार विजय औटी यांच्या कामांचा आदर्श घेऊन काम करत असताना एखादी संधी मिळाली की त्या संधीचे सोने करायचे. गेल्या अडीच वर्षात मला पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी जिल्हा परिषदेत बांधकाम समितीमध्ये काम करण्याची संधी दिली त्या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकास कामे करण्यासाठी केला. माझ्या टाकळी ढोकेश्वर गटाव्यतिरिक्त तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लावली हे करत असताना जिल्ह्यातील सर्व सदस्यांना निधीचे वाटप केले. तालुक्यात निधी देताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन लोकांचीे प्राथमिक गरजांची कामे मार्गी लावली. यावेळी उपस्थित महिलांनी लोणी मावळा ते दरोडी व रांधे ते चोरदारा रस्ता पूर्ण करून देण्याची मागणी सभापती दाते यांच्याकडे केली असता संपूर्ण रस्ता डांबरीकरण करून देण्याची ग्वाही सभापती दाते सर यांनी दिली. कामाची काळजी करू नका उद्याच्या काळात तालुक्यातील अडचणीत राहिलेले कामे मार्गे लावणार आहे. या गटात शिवसेना ज्यांना उमेदवारी देईल त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहनही सभापती दाते यांनी केले.
यावेळी उपतालुकाप्रमुख संतोष शेठ येवले, विभाग प्रमुख सखाराम उचगरे सर, कापसे सर माजी सरपंच बाळासाहेब आवारी, डी एस आवारी सर, उपसरपंच संतोष काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
[औटी साहेबांच्या कार्यकाळात मी आणि दाते सरांनी कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली. राजकारण म्हणजे रोज उठून कोणाची तरी खोड मोडायची असं नव्हे. समाजासाठी खूप काही करता येते दाते सरांनी आपल्या पदाचा उपयोग जनतेसाठी केला. निवडणूक आल्यानंतर काही आमिषे दाखवली जातील, तालुक्यात पाणी आणण्यासाठी सर्वे चालू होतील, परंतु कोणत्याही भुलथापांना बळी न पडता काम करणाऱ्या माणसांच्या मागे उभे रहा : रामदास भोसले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख]
यावेळी गणप्रमुख संतोष साबळे, बाळासाहेब साबळे, अनिल आवारी, शाखाप्रमुख अमोल आवारी, उपशाखाप्रमुख अनिल आवारी, ग्राम. सदस्य दिलीप आवारी, गोकुळ आवारी, देवराम आवारी, सरपंच अरुण आवारी, उपसरपंच संतोष काटे, वरून सोनवणे, संतोष लामखडे, चेअरमन उत्तम गायकवाड, बाळासाहेब आवारी, संतोष लामखडे, दशरथ आवारी, दत्तात्रय झिंजाड, विशाल लामखडे, चांगदेव थोरात, शंकर सरोदे, भगवान पावडे, अमोल शिंदे, संपत सरोदे, मंगेश आवारी, किरण आवारी, माधव आवारी, शिवाजी झिंजाड, रामदास भोसले, नवनाथ लामखडे, महेंद्र आवारी, मच्छिंद्र चौधरी, दीपक शेटे, अशोक आवरी, सुरेश थोरात, रंजना तावरे, सुरेखा आवारी, आनंदाबाई आवारी, मनीषा भोसले, प्रतिभा साबळे, मंदा साबळे, सुरेखा सरोदे, हिराबाई सरोदे, सुंदर झिंजाड, पारूबाई पारधी, हौसाबाई सरोदे, लक्ष्मीबाई भोसले, ग्रामसेवक शेळके कामाचे ठेकेदार विनायक कवाद, फारुख शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल आवारी यांनी केले तर आभार संतोष साबळे यांनी मानले.