दैनिक चालू वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
अककलकुवा तहसिल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष ,जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांच्या हस्ते तालुक्यातील कोतवाल, तलाठी, मंडळअधिकारी, नायब तहसिलदार या अधिकारी व कर्मचार्याच्या तहसिल कार्यालयात प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले. तसेच कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तहसीलदार सचिन मस्के, निवासी नायब तहसिलदार दिलीप गांगुर्डे, नायब तहसिलदार अजित शित्रे,मंडळ अधिकारी, तलाठी, कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
तालुक्यातील सहा मंडळातुन प्रत्येकी एक कोतवाल प्रमाणे सन्मान करण्यात आला. त्यात संतोष पवार अककलकुवा, सुभाष ब्राम्हणे मोरंबा, बिज्या वसावे मोलगी,धोमा पाडवी डाब,ठोग्या वळवी वडफळी, सुभाष वसावे खापर, तसेच तलाठी दयानंद हाळे राजमोही , प्रविण गायकवाड पेचरीदेव ,दिपक राऊत मोलगी,ललित बागुल ओहवा ,संदिप तडवी वडफळी, दिपाली धनगर ब्रि. अं. विहिर, व अककलकुवा तहसिल कार्यालयातील महसुल सहाय्यक राजरत्न सोनवणे,डाब मंडळ अधिकारी तुषार चंद्रात्रे,संगायो अव्वल कारकुन रमेश ठाकरे,निवासी नायब तहसिलदार दिलीप गागुर्डे यांचा यावेळी तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष ,जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देवुन गौरविण्यात आले .