दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
औरंगाबाद जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायती पैकी तब्बल 12 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व गाजवले आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेला 15 पैकी फक्त एका ग्रामपंचायतमध्ये यश मिळालं असून काँग्रेसला तर एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. तर भाजपला एका ठिकाणी यश मिळालय.
वडगाव कोल्हाटी एकूण जागा – 17
• संजय सीटसाठ, शिंदे गट – 11 जागा
• शिवसेना – 4 जागा
• भाजप – 2 जागा
सिल्लोड
• उपळी अब्दुल सत्तार (शिंदे गट )
• नानेगाव अब्दुल सत्तार (शिंदे गट )
• जांभळा अब्दुल सत्तार (शिंदे गट )
गंगापूर
• अगरकानडगव- भाजप
• ममदापूर – शिवसेना ठाकरे गट
वैजापूर
• पणवी खंडाळा रमेश बोरणारे (शिंदे गट)
• लाख खंडाळा रमेश बोरणारे (शिंदे गट)
पैठण
• खादगाव राष्ट्रवादी
• खेरडा संदीपान भुमरे (शिंदे गट)
• नानेगाव संदीपान भुमरे (शिंदे गट)
• आपेगाव संदीपान भुमरे (शिंदे गट)
• अगर नांदूर संदीपान भूमरे (शिंदे गट)
• शेवता संदीपान भुमरे (शिंदे गट)
• तांडा बूदृक संदीपान (भुमरे शिंदे गट