दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
1 ऑगस्ट या महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आज मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते जिल्ह्यातील तहसिलदार संवर्गातून चाकुर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे साहेब यांना उत्कृष्ठ तहसिलदार हा पुरस्कार मिळाला.
2021 – 22 या महसुली वर्षामध्ये चाकुर तालुक्याला देण्यात आलेल्या महसूल वसुलीच्या उद्दिष्ठापेक्षा जास्त म्हणजे 108 टक्के वसुली करून शासनाच्या महसुलात भर घातली आहे.
तसेच शासनाचा महत्त्वकांशी ई पीक पाहणी प्रकल्पात चाकुर तालुका हा सर्वात प्रथम 100 टक्के काम पूर्ण केलेला तालुका ठरला.
यासोबतच तालुक्यातील शिवरस्ते अतिक्रमणमुक्त करणे असेल, 40 ते 50 वर्षापासून प्रलंबित असलेले स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाचे विषय असतील, कोरोना कालावधीत केलेले उत्कृष्ठ नियोजन असेल व याबरोबरच निवडणुकांचे यशस्वी आयोजन असेल प्रत्येक कामात आपला वेगळा ठसा उमटविणारे डॉ तहसिलदार शिवानंद बिडवे साहेब यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांनी मागच्या 3 वर्षात केलेल्या कामाची पावतीच आहे असे म्हणायला हरकत नाही.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल साहेब, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे साहेब, निवासी जिल्हाधिकारी ढगे साहेब, जिल्हा पुरवठा अधिकारी पडदूने साहेब, जिल्हातील सर्व उपविभागाचे उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्याचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.