दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
दिल्ली :- नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची लोहा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. बळीराम पाटील कदम जानापुरीकर, विक्रम कदम सर, डॉ. गौरव पाटील बहिरे यांनी खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांची भेट घेऊन लोहा व कंधार तालुक्यात ढगफुटीझाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे व रस्त्याचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणचे पुल व रस्ते वाहून गेले आहेत. तसेच शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी व कामगार यांना थिर देण्यासाठी आणि त्यांना जगण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे.रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावेत अशी विनंती केली.