दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्याचे सहकार मंत्री ना. अतुल सावे यांच्या हस्ते आज परभणी पोलीस मुख्यालयातील सह्याद्री हॉल ॲन्ड लॉन्सचे उद्घाटन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या औचित्यावर हा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आंचल गोयल, परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार संजय जाधव, राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान, परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर, भाजपा आमदार मेघना बोर्डीकर, गंगाखेड चे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपाधिक्षक आदीनाथ जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, रणजित पाटील, प्रशांत केतकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक आदींची भरगच्च उपस्थिती लाभली होती.