दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे: काल स्टार मिडिया ऑफ अवॉर्ड चे महात्मा फुले सभागृह वानवडी येथे मोठ्या समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसिद्ध समाज सेविका तृप्ती देसाई , ज्येष्ठ अभिनेते मिलिंद दादा दास्ताने, अभिनेत्री कल्याणी सोनवणे व आयोजक अमोल भोंगळे यांचे शुभहस्ते कलाकारांना सन्मानित करण्यात आले. “माझ्यासोबत आज माझ्याच अनेक मैत्रीणीना ही पुरस्कार होते त्यामुळे छान स्नेहमेळावा झाला.” अशी माहिती प्रसिद्ध निवेदिका शोभा कुलकर्णी यांनी दिली.