दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि :जब्बार मुलाणी
===================
पोलीस स्टेशन येथे “कॉमन मॅन वॉल” चे अनावरण” आज दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या (आझादीच्या अमृतमहोत्सव) हडपसर पोलीस स्टेशन येथे ध्वजवंदन संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी हडपसर पोलस स्टेशन कडील सर्व अधिकारी व अमंलदार तसेच परिसरातील सर्व पक्षीय नेते, शाळांचे विदयार्थी, स्पर्धा परीक्षांकचे विद्यार्थी, निवृत्त पोलीस अधिकारी व अमलदार, नागरीक आणि तालगर्जना वादपथक हडपसर असे ८०० ते १००० लोक उपस्थित होते.
ध्वजवंदनानंतर पोलीस स्टेशन समोरील दर्शनी भागेत उभारण्यात आलेल्या “कॉमन मॅन वॉल” चे अनावरण पोलीस स्टेशनची मागील ११ वर्षापासुन स्वच्छता करणाऱ्या सफाई सेविका सौ. सुनंदा प्रशांत जांभुळकर यांचे हस्ते करण्यात आले. “कॉमन मॅन वॉल” ची लांबी २६ फुट व उंची ११ फुट असुन त्यावर जगप्रसिध्द व्यंग चित्रकार श्री आर. के. लक्ष्मण यांच्या “कॉमन मॅन वॉल” आणि पोलीस यांचे गळा भेटीचे श्री-डी प्रकाश चित्र तयार करण्यात आले संपूर्ण रंगरंगोटी रांगोळी तसेच विधूत रोषणाई करण्यात आली. हडपसर पोलीस स्टेशन हे कायमच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र बिंदु मानुन त्याला मदत करण्यासाठी सामन्यावरील अन्याय दुर करण्यासाठी कायमच तत्पर असणार आहे अशी भुमिका हडपसर पोलीस स्टेशन अधिकारी व अमलदार यांची आहे. “कॉमन मॅन बॉल” उभारणी आणि उद्घाटन ही संकल्पना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांची असुन ही भिंत हडपसर पोलीस स्टेशनच्या प्रवेशव्दाराचे दर्शनी भागी उभारण्यात आली आहे.
सदर भिंत उभारण्यासाठी नगरसेवक आनंद अलकुंटे, शिवराज आप्पा घुले, संजय हरपळे, नगरसेवक गणेश आबा ढोरे, उल्हास बापु शेवाळे, अॅमनोरा संचालक सुनिल तरटे या हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पक्षीय नेत्यानी वस्तु रुपाने आपले योगदान दिले. तसेच सदर भिंतीच्या कामामुळे पोलीस स्टेशन प्रांगणातील खराब झालेल्या पेव्हींग ब्लॉक श्री. योगेश पासलकर यांनी नव्याने बदलुन दिले. हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने वरील योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. “कॉमन मॅन वॉल” उभारणीसाठी पोलीस स्टेशनच्या वतीने सहा. पोलीस उप-निरीक्षक दिनेश शिंदे, पोलीस हवालदार राहुल मोकाशी, सिध्देश्वर पळसे, पोलीस नाईक सुनिल हानवते, अमोल मकंराज, समीर पांडुळे, पोलीस अमंलदार उमेश शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. ध्वजवंदन आणि कॉमन मॅन वॉल चे अनावरण झालेनंतर हडपसर येथील ताल गर्जना वाद्यपथकाने शानदार ढोल लेझीम वादनाचे प्रात्यक्षिक दिले. काही महीन्यापुर्वी आमदार माननिय श्री चेतन तुपे पाटील आणि स्थानिक नागरीकांच्या सहयोगाने हडपसर पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अमंलदारांनी माळवाडी स्मशानभुमी जवळील शासकीय जागेत स्थलांतरीत हडपसर पोलीस चौकीचे निर्माण केले आहे.
(अरविंद गोकुळे) वरीष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे, पुणे शहर